स्थापना
कार्तिक कृ.१३ – दि.२४ डिसेंबर, २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्रीअरविंदनाथ महाराज रनाळकर.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते।’, ‘सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते।।’.
– श्रीगीता
ज्ञानाशिवाय केलेले कोणतेही कर्म अपेक्षित फलप्राप्ती करून देऊ शकत नाही म्हणून संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
‘कर्माचे डोळे ज्ञान। ते निर्दोख होआवे।।’.
– श्रीज्ञानेश्वरी
ज्ञानसेवा प्रतिष्ठान
- आध्यात्मिक
- शैक्षणिक
- सामाजिक
अशा तीनही क्षेत्रात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कार्यरत आहे. आपली दिव्यतम भारतीय संस्कृती सांगते, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’. आपल्याला अंधाराकडून स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे. म्हणून ज्ञानसेवा प्रतिष्ठानचे ब्रीद आहे…
‘दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।’
– पसायदान
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर सर्व संतांनी भागवत धर्माचा प्रसार केला व कृतार्थता अनुभवली. संत श्रीनामदेवराय तर पंजाबात गुमानपर्यंत गेले. आपणही संतांना अनुसरून ही ज्ञानगंगा ज्या ज्या माध्यमातून शक्य आहे त्या त्या माध्यमातून घरोघरी व भावी पिढीपर्यंत घेऊन जायची आहे; तरच आज समाजात ज्या समस्या, अस्थिरता आहे त्याचे निराकरण होऊ शकेल व आपल्या ऊर्जस्वल संस्कृतीची जोपासनाही होईल. हेच आपले कार्य अन् हीच आपली साधना!
अशी आहेत ज्ञानसेवा प्रतिष्ठानची उद्दिष्ट्ये
१) संतांनी पुरस्कारलेल्या शुद्ध अध्यात्म-ज्ञानविषयक प्रबोधनासाठी प्रवचन, कीर्तन, व्याख्यानांचे आयोजन करणे.
२) शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तिमत्त्व संस्कार वर्ग / शिबिरे / स्पर्धा / व्याख्याने आयोजित करणे.
३) सार्वजनिक हितासाठी वैद्यकीय आरोग्य सेवा, रक्तदान शिबिरे आयोजित करणे.
४) शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अध्यात्म-योगविषयक व्याख्याने व शिबिरे आयोजित करणे.
५) नियतकालिके व प्रकाशनाद्वारे समाजप्रबोधन करणे.
६) पर्यावरण रक्षण, सेंद्रिय/नैसर्गिक शेती, स्वच्छता, जलव्यवस्थापन, स्त्री-सन्मान यासारख्या सामाजिक विषयांबाबत जनजागृती.
७) वृद्धाश्रम, अनाथालये, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना साह्यभूत होणे.
प्रबोधन सेवा

प्रवचने, व्याख्याने, चिंतनवर्गद्वारे समाजप्रबोधन : श्रीगीता, श्रीज्ञानेश्वरी, श्रीभागवत, श्रीरामायण, श्रीमहाभारत, श्रीदासबोध, संतांचे अभंग, संतांचे प्रबोधनकार्य, श्रीज्ञानेश्वरीतील स्वधर्मविचार, श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ तसेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे, जगूया जीवन आनंदाने यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर व्याख्याने व मार्गदर्शन.
सामाजिक उपक्रम

सामाजिक उपक्रम : पर्यावरण रक्षण, गरजू विद्यार्थ्यांना मदत, आरोग्य विषयक जागृती, अनाथालय – वृद्धाश्रमांमधून भेटी- संवाद, आपदग्रस्तांना मदत, वनवासी पाड्यांना भेटी इ.
शैक्षणिक उपक्रम

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम: व्यक्तिमत्त्व विकास संस्कार वर्ग, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, चर्चासत्रे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करणाऱ्या विविध प्रासंगिक स्पर्धा, तसेच पर्यावरण, स्वच्छता-मन ते परिसर, नैराश्यातून यशस्वितेकडे यासारख्या विषयांवर व्याख्याने-कार्यशाळा.
आगामी कार्यक्रम
प्रतिष्ठानबद्दल
कार्तिक कृ.१३ दि.२४ डिसेंबर २०१९ रोजी संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी दिन, या महत्त्वपूर्ण तिथीचे औचित्य साधून आपण ‘ज्ञानसेवा प्रतिष्ठान’ ही संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रेरणास्थान आहेत, वै.प.पू.गुरुजी श्री अरविंदनाथ महाराज रनाळकर.
संपर्क
info@dnyansevapratishthan.com
091379 80993/ 7034436132
083693 26995/7045536132
34, लक्ष्मी नारायण, डीएनसी रस्ता, प्रगती महाविद्यालयासमोर, डोंबिवली (पूर्व)











